जमाव जमवून आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार

Complaint lodged against BJP workers

औरंगाबाद : टाळेबंदी असताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यालय उघडून कोरोनाचे गांभीर्य न बाळगता, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या आ. हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड, विजया राहटकर, अनिल मकरिये यांच्यासह सुमारे १७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

आंदोलनातील कार्यकर्त्यांनी नागरिकांना बाहेर पडण्यास प्रोत्साहित केले. परिणामी लॉकडाऊनचे उल्लंघन झाले. केवळ राजकीय स्टंट करण्यासाठी स्वतः सह इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न भाजप खासदार आणि आमदारांनी केला आहे. कोरोना हा संसर्गजन्य असल्याने इतरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करणे, बेकायदा जमाव जमवणे, विनापरवानगी कार्यालय उघडणे, लॉकडाऊनचे निर्बंध झुगारणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER