कोरोना रुग्णांच्या मृत्युप्रकरणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसात तक्रार !

Pramod Sawant

पणजी :- येथील गोवा मेडिकल कॉलेज अ‌ॅण्ड हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मृत्यूच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांत या रुग्णालयात ७४ रुग्णांनी जीव गमावला आहे. मंगळवारी २६, बुधवारी २०, गुरुवारी १५ आणि शुक्रवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यू ऑक्सिजन (Oxygen) अभावी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणी गोवा फॉरवर्ड पार्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने ऑक्सिजन पुरवठ्यावरून सुरू असलेल्या या गोंधळप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे.

ही बातमी पण वाचा : दोन दिवसांपूर्वी गोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा, तर आज १५ जणांचा मृत्यू

ही तीन सदस्यीय समिती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. गोव्यात गेल्या काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होते आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट गोव्यात आहे. गुरुवारी रुग्णवाढीचा दर ४८.१ टक्के होता. गेल्या २४ तासांत गोव्यात २ हजार ४९१ रुग्णांची नोंद झाली आहे व ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button