फडणवीस-दरेकर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार!

Devendra Fadnavis - Pravin Darekar

मुंबई : विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रविण दरेकर (Praveen Darekar) यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. ही तक्रार राष्ट्रवादीच्या (NCP) लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने (Nitin Mane) यांनी दिली. या तक्रारीत सरकारी कामात व्यत्यय आणणे, पोलीस अधिकाऱ्यांना धमकावणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे (BJP) नेते प्रसाद लाड (Prasad Lad) हे दमणच्या कंपनीत रेमडिसिवीर इंजेक्शन्स घेण्यासाठी गेले होते. तेव्हा कंपनीने सांगितले की, केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडिसिवीर इंजेक्शन्स (Remdesivir) महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत. त्यानुसार केंद्राची परवानगी घेऊन रेमडिसिवीरचा काही साठा महाराष्ट्रात पाठवला होता.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात रेमडिसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा भासत आहे. सरकार रेमडिसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. त्यातच १२ एप्रिलला प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीत पोहोचले. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना ५० हजार इंजेक्शन्स दिले गेले. ही इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार आहोत, असे भाजप नेत्यांनी सांगितले होते.

ही बातमी पण वाचा : तळीरामांना लवकर कोरोना होतो हे संजय गायकवाड यांनी समजून घ्यावे, फडणवीसांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button