राज्याच्या एका मंत्र्याविरुद्ध पोलिसात तक्रार

Nitin Raut

मुंबई : पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी (pooja chavan case) शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राठोड (Sanjay Rathore) यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. स्फोटके भरलेली कार उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडणे, त्यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची भूमिका यामुळे वझे यांना अटक झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत आले असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याविरुद्ध राज्य सरकारचे चार्टर्ड विमान बेकायदा वापरल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

ही तक्रार भाजपाचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी केली आहे. मुंबईतील निर्मल नगर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, मंत्री नितीन राऊत यांनी जुलै महिन्यात दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई असा चार्टर्ड विमानाने प्रवास केला. हा सगळा प्रवास खासगी होता. राऊत यांनी सरकारी कंपन्यांवर दबाव टाकून त्यांना या विमानाचे भाडे भरायला लावले.

कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना नितीन राऊत यांनी बेकायदा राज्य सरकारचे चार्टर्ड विमान वापरले. हे विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते, ती राऊत यांनी घेतली नव्हती. परस्पर विमानाचा वापर केला आहे, असा आरोप पाठक यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. यासाठी राऊत यांच्याविरुद्ध कलम ४०६, ४०९ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पाठक यांनी केली.

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राऊत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. तसे न झाल्यास मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा पाठक यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER