भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार प्रवीण दटके यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार दाखल

Pravin Datke

नागपूर : येत्या १ मे रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उभे असलेले भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्ह्याची माहिती लपवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्यात वकील सतीश उके यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

प्रवीण दटके यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरूद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी खटला क्रमांक 321/2006 बद्दलची माहिती लपविली आहे. ७ वे संयुक्त नागरी न्यायाधीश, कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी, प्रथम श्रेणी, नागपूर यांच्यासमोर खटल्याची माहिती देणे त्यांचे कर्तव्य होते. हे निवडणूक कायद्यांतर्गत चुकीचे प्रमाण आहे. दटके यांचा उमेदवारी अर्ज नाकारला जाऊ शकतो. दटके देखील कायद्यानुसार फौजदारी कारवाईस जबाबदार आहेत. असे उके यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरपी अधिनियम कलम १२5-अ अन्वये आयपीसीच्या विविध कलमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उके यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला