आघाडी सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठीच माझ्याविरोधात तक्रार, अनिल परबांचे स्पष्टीकरण

Anil Parab

मुंबई : नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात आरटीओच्या निलंबित अधिकाऱ्याने परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन जोरदार राजकारण पेटलं असताना आता खुद्द अनिल परब (Anil Parab) यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करुन माझी व महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi Govt) बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे.

मंत्र्यांवर आरोप करुन राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मलिन करणे, या राजकीय हेतून केलेली ही तक्रार आहे”, असं ट्विट अनिल परब यांनी केलं आहे.

ही बातमी पण वाचा : 100 कोटींची महावसुली 300 कोटींवर? अनिल परब यांनी राजीनामा द्यावा ; मनसेची मागणी  

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button