अखेर करुणा शर्मानेही मौन सोडलं, धनंजय मुंडेंविरोधात थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Karuna Sharma-Dhananjay Munde

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण यांच्याविरोधात आता आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा यांनीच आता एकदा मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यापूर्वी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांची बहीण रेणू शर्मा यांनी तक्रार केली होती. मात्र त्यांनी ती तक्रार मागे घेतली होती.

करुणा शर्मा यांनी आत मौन सोडलं असून, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मा यांनी असाही आरोप केला आहे की, मला त्यांच्याशी भेटू देत नाही. 24 जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बँगल्यावर जाताच, मुंडे यांनी 30 ते 40 पोलिसांना बोलावून मला हकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात 14 वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आजाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी दया. आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. रेणू शर्मा यांच्या आरोपांनुसार 2006 पासून आपल्यावर अत्याचार सुरु आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER