बीएचआर घोटाळ्यात गिरीश महाजनांशी संबंधित कंपनीचा सहभाग ; अनिल गोटेंचा आरोप

Anil Gote - Girish Mahajan

नाशिक : भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) (BHR) सहकारी बँकेतील कथित ११०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी राजकीय गोटात एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा प्रत्यक्ष संबंध असलेल्या एका कंपनीचा बीएचआर घोटाळ्यात थेट संबंध आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे (NCP) नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी केला.

तसेच, पैसे खाताना त्यांनी कचराही सोडला नाही, अशी टीकाही त्यांनी महाजनांवर केली. ते नाशिकमध्ये बोलत होते. गिरीश महाजन यांचा प्रत्यक्ष संबंध असलेल्या एका कंपनीचा बीएचआर घोटाळ्यात थेट सहभाग आहे. या कंपनीचे सुनील झवर, संचेती आणि बोरा असे तीन संचालक आहेत. हे तिन्ही संचालक गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत, यांनी पैसे खाताना कचरासुद्धा सोडला नाही, असे अनिल गोटे म्हणाले.

तसेच, १०० टक्के पुराव्यांसहित बोलत असल्याचा दावादेखील त्यांनी केला. नाशिक, धुळे, जळगाव येथील महापालिका आयुक्त, महापौर स्थायी समितीचे सभापती हेदेखील या गैरव्यवहारात भागीदार असल्याचा गौप्यस्फोट अनिल गोटे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER