सुवर्णपदक विजेती मधुरिका पाटकरचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत

मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवुन देणारी ठाण्याची सुवर्ण कन्या मधुरिका पाटकर ( तोलगळकर ) मंगळवारी दुपारी मुंबईत दाखल झाली. यावेळी भाजप आमदार संजय केळकर यांनी तिचे विमानतळावर सरकार आणि ठाणेकरांतर्फे स्वागत केले. यावेळी मधुरिकाचे आई-वडिल आणि सासरची मंडळी देखील उपस्थित होती.

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला टेबल टेनिस गटात सिंगापूरच्या संघाला पराभूत करून भारतीय महिलांनी एतिहासिक कामगिरीची नोंद केली होती. तिच्या सुवर्ण कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आज तिचे ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर जकात नाका येथे ठाणेकरांच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले आहे.