उद्यापासून किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू; सरकारचा निर्णय

Ajit Pawar

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात सध्या १५ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. यातच आता कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. यामध्ये काही घटकांना सूट देण्यात आली आहे. किराणा दुकानावर गर्दी होताना दिसत आहे. हे लक्षात घेता किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑक्सिजनबाबत चर्चा
“वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात यावे. २ ते ३ आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी सुरू करावी. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा. अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत. त्यांचा शोध घेऊन ती संयंत्रे दुरुस्त करावी. कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सचिवांनी जिल्हा प्रशासन आणि मंत्रालयातील दूवा म्हणून जबाबदारी घ्यावी.” असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

ही बातमी पण वाचा : संवेदनशील राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्याना ४८ तासांपूर्वीची कोरोना चाचणी अनिवार्य

रेमडिसिवीर इंजेक्शनवरही चर्चा
“महाराष्ट्रात रेमडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशातील प्रमुख ७ रेमडिसिवीर निर्मात्या कंपन्यांशी खरेदीसाठी चर्चा होत आहे. केंद्रालाही यासंदर्भात विनंती केली आहे. रेमडिसिवीर निर्मात्या कंपन्यांच्या क्षमतावाढीसाठी सहकार्य करण्यात येत आहे. लवकरच राज्याला पुरेसा रेमडिसिवीर साठा उपलब्ध होईल.” असा विश्वास बैठकीत व्यक्त केला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यात येतील. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

Check Online PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button