अखेर गृहमंत्री देशमुखांवर झालेल्या आरोपाच्या चौकशीसाठी समिती, ‘सहा महिन्यात अहवाल मिळणार’

Anil Deshmukh - Parambir Singh - Maharastra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक लेटरबॉम्ब टाकून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. विरोधकांकडून सतत होत असलेल्या टीकेनंतर आता आघाडी सरकारने मोठा निर्णय घेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापन केली आहे. ही समिती पुढील ६ महिन्यात आपला चौकशीचा अहवाल ठाकरे सरकारला सोपवणार आहे.

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला सहा महिन्यात आपला अहवाल सादर करायचा आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून, याची वरिष्ठ यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु, तुम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल का केली नाही, असा सवाल करत सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव रेड्डी आणि न्यायमूर्ती कौल या द्विसदस्यीय खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला होता. तसंच, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने ‘ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले आहे, ते अनिल देशमुख यांना पक्ष का बनवले नाही’, असा सवाल केला आणि हायकोर्टात जाण्याची सूचना केली. त्यानुसार, आता उद्या मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button