‘त्यांचा सत्यानाश होईल !’ योगींचे संतापजनक आणि सूचक विधान

CM Yogi Adityanath

लखनऊ : हाथरस येथे झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेवरून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. देशभरात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आंदोलने होत आहेत. अशातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यावर अखेर भाष्य केलं आहे.

उत्तरप्रदेशातील माता-भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहचविण्याचा विचारसुद्धा करणाऱ्यांचा सत्यानाश होईल, असे संतापजनक आणि सूचक विधान योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. त्यांनी ट्विट करून हाथरस येथील घटनेवर भाष्य केलं आहे. उत्तरप्रदेशातील माता-भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहचविण्याचा विचारसुद्धा करणाऱ्यांचा सत्यानाश होईल. लोक भविष्यातही लक्षात ठेवतील, अशी शिक्षा या लोकांना देऊ.

राज्यातील माता-भगिनींच्या संरक्षण आणि विकासासाठी उत्तरप्रदेश सरकार वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प असून वचन आहे, असं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. दरम्यान, आदित्यनाथ यांनी ट्विट करून महिलांच्या सुरक्षेची हमी दिली असली तरी हाथरस आणि बलरामपूर घटनेचा या ट्विटमध्ये उल्लेख केला गेलेला नाही. तसेच आतापर्यंत आरोपींविरोधात काय कारवाई केली? किंवा पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला त्यावर काहीही भाष्य न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER