स्थानिक कायद्यांचे पालन करण्यास वचनबद्ध, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे स्पष्टीकरण

Google CEO Sundar Pichai

नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिजिटल माध्यमांसाठी लागू केलेल्या नियमावलीविरोधात व्हॉट्सअ‍ॅपने (whatsapp) दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली होती. याबाबत whatsapp आणि केंद्र यांच्यात न्यायालयात वाद सुरू आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने नवीन नियमांना विरोध केला आहे. मात्र, व्हाट्सअँपचा दावा केंद्राने बुधवारी फेटाळला. या पार्श्वभूमीवर नवीन डिजिटल नियमावलीबाबत Google चे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी भुमिका स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले की, “आम्ही प्रत्येक देशात नेहमीच स्थानिक कायद्यांचा आदर करतो आणि आम्ही रचनात्मकपणे कार्य करतो. आमच्याकडे स्पष्ट पारदर्शकता अहवाल आहे. आम्ही सरकारी नियमांचे पालन करतो, तेव्हा आमच्या पारदर्शकता अहवालात त्याचा उल्लेख करतो. स्वतंत्र आणि मुक्त इंटरनेट ही ‘मूलभूत गोष्ट’ आहे आणि याची भारतात पूर्वीपासून परंपरा आहे. एक कंपनी म्हणून आम्हाला मुक्त इंटरनेटचे मूल्य आणि फायदे याबद्दल स्पष्टपणे माहिती आहे. आम्ही जगभरातील नियामकांशी सर्जनशीलपणे जोडल्या जात असतो.”

सरकारच्या नियमांच्या विरोधात इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने न्यायालयाचे दार ठोठावले. अ‍ॅप्लिकेशनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने युझर्सच्या गोपनीयतेवरील नव्या नियमावलींच्या परिणामाचा संदर्भ दिला आहे. नवीन नियमावलीविरोधात व्हॉट्सअ‍ॅपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भारत सरकारचे नवीन नियम युझर्सच्या गोपनीयतेची सुरक्षा खंडित करण्यास भाग पाडतील, असा दावा व्हॉट्सअ‍ॅपने केला आहे.

सरकारने सांगितले की, “ते गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करते आणि नवीन आयटी नियमांनुसार ओळखल्या गेलेल्या संदेशांचे मूळ स्त्रोत सांगण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅपला विचारणे म्हणजे गोपनीयतेचे उल्लंघन नाही. यासह सरकारने नवीन नियमांबाबत सोशल मीडिया कंपन्यांकडून अनुपालन अहवाल मागविला आहे.”

नव्या नियमावलीबाबत केंद्राची भूमिका

या नियमामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले. सरकार गोपनीयतेच्या अधिकाराला पूर्ण मान्यता देतो आणि त्याचा आदर करते. व्हॉट्सअ‍ॅपच्या सामान्य वापरकर्त्याने नवीन नियमांविषयी घाबरू नये. नियमालीत नमूद केलेल्या विशिष्ट गुन्ह्यांसंदर्भातला मेसेज कोणी आधी पसरवला हे शोधणे याचे संपूर्ण उद्दीष्ट आहे.” असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button