संघाचं स्तुत्य कार्य, २० वर्षांपासून बंद असलेल्या रुग्णालयात उभारलं कोविड सेंटर

Maharashtra Today

कोलार : संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत आहे. अनेक राज्यांमध्ये याची तीव्रता अधिक असून, रूग्णसंख्या हजारांच्या वर जात आहे. यामुळे अनेक राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन देशात अनेक सामाजिक संस्था, संघटना मदतीसाठी पुढे येतायत. कर्नाटकमधील कोलार गोल्ड फिल्ड (Kolar Gold Field) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसुद्धा(BJP) पुढे आली आहे. त्यांनी एकाच वेळी ३०० कोरोना रुग्णांवर उपचार करता येईल असे कोविड सेंटर(Covid Center) उभारले आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी मागील वीस वर्षांपासून बंद पडलेल्या रुग्णालयाची अवघ्या १५ दिवसांत डागडुजी करत उपचारासाठी सज्ज केले आहे.

कर्नाटकमध्ये कोलार गोल्ड फिल्ड येथे भाजप आणि संघाच्या काही कार्यकर्त्यांनी एक कोविड सेंटर सुरु केले. हे कोविड सेंटर बंगळुरुपासून १०० किमी अंतरावर असून या कोविड सेंटरसाठी जवळपास ३०० स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. कोलार जिल्ह्याचे भाजपचे खासदार एस. मुनीस्वामी यांनी सांगितले की, ‘कोलार येथील भारत गोल्ड माईन लिमीटेड हॉस्पीटल तसे खूप जुने आहे. या रुग्णालयामध्ये खाणीमध्ये काम करणाऱ्यांवर उपचार केले जायचे. मात्र, नंतर हे रुग्णालय २००१ मध्ये बंद पडले. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भाजपच्या शहराध्यक्षांनी या रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्याविषयी कल्पना दिली. त्यांतर आम्ही कामाला लागलो.

या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपाचार करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी संघ परिवाराच्या स्वयंसेवकांनी कशी मेहनत घेतली याबद्दल एस. मुनीस्वामी यांनी सांगितले की, या रुग्णालयात यापूर्वी १२०० लोक काम करत होते. या रुग्णालयात ८०० बेड्स होते. मात्र, हे रुग्णालय २०० साली बंद पडले. सध्या बेड्स कमी पडत असल्यामुळे आमच्या संघ परिवाराने याच ठिकाणी ३०० रुग्णांवर उपचार करता येईल, असे कोविड सेंटर उभे करण्याचे निश्चित केले. त्यासाठी जवळपास २५० लोकांनी दिवसरात्र मेहनत घेतली. त्यानंतर न थकता काम केल्यामुळे अवघ्या १५ दिवसांमध्ये येते कोविड सेंटर उभे आहे. या ठिकाणी एकाच वेळी २२० रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. हे कोविड सेंटर येत्या सोमवारी सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button