
पुणे : वारकरी संप्रदायाचे आराध्यस्थान असलेले पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आजपासून (६ डिसेंबर) ७२० वा संजीवन समाधी सोहळा आरंभ झाला. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी आळंदीत आजपासून नऊ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
११ डिसेंबरला कार्तिकी एकादशी आणि १३ डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त दरवर्षी राज्यातून चार ते पाच लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला येत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी पोलीस आणि मंदिर प्रशासनाने ६ ते १४ डिसेंबर दरम्यान संचारबंदी घोषित केली. त्यामुळे संजीवन समाधी सोहळ्याचा हा सप्ताह २० ते जास्तीत जास्त ५० वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला