विसंवादाच्या वाटेवरून माघारी येताना …

Coming back from the path of disagreement

फ्रेंड्स ,मागच्या “ये सब मेरे ही साथ क्यू?” या लेखामध्ये पालक, प्रौढ आणि बालक या प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसून येणाऱ्या ‘इगो स्टेट्स ‘ची वैशिष्ट्य जाणून घेतली. कुणी फार लवकर चिडतात, कोणी स्वतःच्या चुकीचे खापर दुसऱ्याच्या वर फोडतात. आपल्या आजूबाजूला घरांमधून किंवा इतरत्र खूप अनपेक्षित,आणि विचित्र प्रतिक्रिया (Reaction) असलेले संवाद घडत असतात. त्यामुळे नाती दुरावतात .व्यक्ती संवादासाठी पुढे घेतलेला हात मागे घेतात. असं घडत असतं . ते का ? याचे उत्तर शोधताना प्रत्येक व्यक्तिमत्त्वामध्ये असणारे ‘इगो स्टेट्स ‘आणि यावर आधारित बालपणाच्या विकास अवस्थेतील प्रसंगांमूळे निर्माण झालेले ‘ बिलिफस् ‘आयुष्यभरासाठी कसे निर्माण होतात ते थोडक्यात बघू .

* I am not OK , you are Ok ! : झिरो ते दहा महिन्यांपर्यंत आणि साधारण बाहेर पाऊल पडेपर्यंत ही अवस्था असते. जन्मतः त्याला वाटणारा असुरक्षित पणा आणि नंतर आईच्या कुशीत वाटणारा सुरक्षितपणा , त्यानंतरही दहाव्या महिन्यापर्यंत पूर्णपणे मोठयांवर अवलंबून असतो. तोपर्यंत हीच belief कायम असते. यावेळीच बदलवायचा असतो तो पूर्वार्ध ! ते काम सोपे जाते. त्यासाठी शाब्बास ! व्हेरी गुड ! नुसते कौतुकाचे हसू यासारख्या गोष्टीतून मिळणाऱ्या स्ट्रोक्सची गरज असते. त्यातूनच त्याची “आय एम ओके ! “कडे वाटचाल सुरू होते.

* I am not OK , you are not Ok ! : परंतु योग्य स्ट्रोक्स देण्याऐवजी जर पालकांनी अति जास्त बंधने किंवा पाय ओढणे ,कुठलाही सपोर्ट न करणे अशा गोष्टी घडत असतील तर किंवा अतिशय अमानुष वागणूक पालक देत असतील तर असा belief विकसित होतो. उदाहरणार्थ “शक्ती” सिनेमातील अमिताभ व दिलीप कुमार यांचा रोल आठवून बघा. यात अमिताभ लहान असताना किडनॅप केला जातो ,तेव्हा पोलिस ऑफिसर असलेल्या वडिलांना फोन जातो .(की आम्हाला सोडा नाहीतर तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे) धमकी देतात .तेव्हा दिलीप कुमार म्हणतो की काहीही करा ,पण मी गुन्हेगाराला माफ करणार नाही ! यामुळे छोट्या अमिताभच्या मनात अत्यंत वाईट रागाची भावना वडिलांबद्दल निर्माण होते. हळूहळू वडिलांशी वादविवाद व्हायला लागतात. एकूणच सगळ्या मोठ्याबाबत हा राग वाढीस लागतो. आणि मग “आय एम नोट ओके” बरोबर ” यु आर नॉट ओके “अशी बीलिफ विकसित होते.

* I am OK, you are not OK!” : अशी मुलं ज्यांचे घरी वादविवाद होतात, मोठ्यांबाबत राग निर्माण होतो. ते हळू हळू घरापासून तुटत जातात आणि गुन्हेगारी जगतामध्ये जातात. अशी मुले स्वतःचे अश्रु स्वतः पुसतात. स्वतःचे स्ट्रोक सुद्धा स्वतः घेतात ! स्वतः मधील पॅरेण्ट फाईल पूर्ण बंद करतात, आणि आता “मी करेल तो कायदा,” असं म्हणून मी निगरगट्ट होतात. कधी स्वतःची चूक आहे हे समजत नाहीत. उदाहरणार्थ व्हीं .शांताराम यांच्या” दो आखे बारा हाथ ” या सिनेमातले कैदी. कुणी चांगले स्ट्रोक्स देणारा पालक मिळालाच तर ते बदलू शकतात.

* I am Ok , you are Ok ! ” : अशा धारणे मध्ये रूपांतर करणे ही खरी गरज असते. ही धारणा अत्यंत चांगली ,विचार, श्रद्धा आणि विश्वासावर आधारित आहे. काही भाग्यवान मुले यांच्या वाट्याला येते. मुले “नोट ओके “वर असताना, म्हणजेच दहा महिने पर्यंत त्यांना ओके कडे कन्वर्ट करणे खूप सोपे असते त्यांच्या पालकांना ! फक्त पूर्वार्ध बदलायचा. मग काय करायचं त्यासाठी ? दोन-अडीच वर्षापर्यंत एखादी हलकीशी चापट कारण तोपर्यंत भाषा समजत नाही ( केवळ काहीतरी वेडेपणा केलाय तेवढ्यापुरती पुरेशी असणारी ! )नंतर त्यांना बालपण अनुभव, कुतूहल ,सृजनशीलता आत्मविश्वास वाढवून देण्यासाठी थोडे मोकळे सोडणे आणि दुरून लक्ष ठेवणे.हे करताना कौतुक करावं ,वेळ द्यावा ,मानाने ,कौतुक केल्याने मुले डोक्यावर बसत नाहीत. हे पक्के लक्षात असू द्या . यामुळे आदर्श अशी बिलीप सिस्टीम तयार होते.

फ्रेंड्स ! आता पण व्यक्ती व्यक्तींमधील होणारे संवाद, आणि त्यांचे प्रकार बघू या. संवाद तीन प्रकारचे असतात. कॉम्प्लिमेंटरी , क्रॉसड हे दोन विशेष.

# कॉम्प्लिमेंटरी .

१) पालक – पालक : बस स्टॉप वर दोन स्त्रिया उभ्या आहेत .एक स्त्री बसची वाट बघत अस्वस्थ हालचाली करून शेजारी बसलेले असलेलीच लक्ष वेधून घेते. मग ती दुसरी स्त्री पण चुळबुळ करते. पहिली स्त्री विचारते की: आता आपल्याला परत उशीरच होणार बहुतेक !
दुसरी स्त्री : नेहमीचच आहे हे !
पहिली स्त्री: तुम्ही कधीही बस वेळेवर पोहोचलेली बघितली आहे का ?
दुसरी स्त्री : कधीच नाही हो !
पहिली स्त्री : आज सकाळीच मी मुलाला म्हटले की या बसेसचे आजकाल काही खरे नाही.
दुसरी स्त्री : हो ! काळाचा महिमा ! दुसरे काय .
असे हे संवाद बालक पालक प्रौढ कुठल्याही स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स मध्ये घडत असू देत. ते पूरकच असतात. त्यांना वस्तुस्थितीशी काहीही घेणे देणे नसते . म्हणून ते कितीही चालू राहू शकतात. इतरांचे दोष काढणे, दुसऱ्यावर खापर फोडणे हे पालकाचे ( पॅरेण्ट स्टेटस )गुण भरलेले असतात.

२) प्रौढ – प्रौढ : त्यांच्याचसमोर एक माणूस बसलेला आहे आणि तो बस चालकाला बस येताच विचारतो की ,”ही बस विरारला वेळेवर पोहोचेल का ? “त्यास योग्य पद्धतीने बसचालक उत्तर देतो, “हो ! बस बरोबर साडेअकराला पोहोचेल विरारला !”
माहिती मिळवण्यासाठी विचारलेल्या सरळ प्रश्नाला दिलेले हे सरळ उत्तर आहे ,म्हणून हे पूरक संभाषण वस्तुस्थितीजन्य माहिती देणारे आहे.

३) बालक – बालक : अशी संभाषणे पूरक न राहता , कंटाळवाणी होऊन कमी होतात .कारण बालकाला प्रोत्साहन मिळविणे यातच जास्त स्वारस्य असते .अशा समाजामध्ये कर्तव्यबुद्धीने कोणी विचार करत नाही. माझा उत्साह टिकविण्यासाठी छोट्या यशाची अपेक्षा आणि यात प्रौढाचा समावेश झाल्याशिवाय कुणाला प्रोत्साहन मिळत नाही म्हणून ते पूरक रहात नाही.

४) याशिवाय सेवा भावी पत्नी( पालक )आणि आजारी पती ( बालक) असेही संभाषण पूरक होते.

# क्रॉसड .

ज्यामुळे मन असता क्लेश होतात असे crossed समाजात घडत असतात. उदाहरणार्थ.

१) नवरा : माझे पॅन कार्ड कुठे आहे ?
बायको : कपाटाच्या वरच्या कप्प्यात डाव्या हाताला बॉक्समध्ये !
किंवा ,”मला माहीत नाही पण मी आलेच शोधायला मदत करते.”
परंतु आता जर बायकोचा दिवस खराब गेलेला असला , तर “जिथे तुम्ही ठेवले तिथे ” असे उत्तर येऊ शकते किंवा “तुम्ही नेहमी माझ्यावरच का ओरडता ?”अशा वेळी संवाद बंद होतो.
पण यामुळे वाद खूप वाढूही शकतात. किती त्याला मर्यादा नाही. “तू, अन् तुझ्या आई-वडिलांच्या सवयी तसल्याच !”
अशा प्रकारच्या संवादाची वारंवारिता वाढत राहिली तर पुढे गेम खेळले जातात. संघर्ष उद्भवतात.
Adult सोडून इतर प्रतिक्रियांचा उगम पालकाच्या “आय एम नॉट ओके” या भावनेतून येतो . अशी व्यक्ती इतरांच्या बोलण्यातून नसलेले अर्थ शोधून काढते.
@कुठून आणलेस हे आंबे ? यावर प्रतिक्रिया होते, ” का? वाईट आहेत का ते ?
@ नवीन हेअर स्टाईल चांगली दिसते. यावर “तुम्हाला आधी तर कधी आवडली नव्हती !”

२) कोरोनाचे दिवस आहेत. एक पेशंट नर्स ला म्हणतो ,”मला अशा रूग्णालयात सेवा करायला आवडेल !” पण नर्स उत्तर देते, “तुम्हाला तुमची काळजी घेता येत नाही, ती घ्या!”
खरं तर हे संभाषण एडल्ट- एडल्ट असे आहे. परंतु नर्सने” पालकाकडून बालकाला” दिलेले आहे. त्यामुळे ते झाले crossed !

३) एक संभाषण पालक आणि बालक यांच्यातले. आई मुलीला ,” जा तुझी खोली आवर !”
यावर मुलीचे उत्तर आहे ,पालक – पालक असे .”मी काय करायचं तू नको सांगू ! तू इथली सर्वेसर्वा नाही, बाबा आहे.”crossed
* ज्या व्यक्तीचा not ok बालक सतत जागा होतो.
– वास्तव समजून घेण्यास असमर्थ. भूतकाळातील गोष्टी सतत सतावत राहतात.
– इतरांनी केलेल्या प्रशनसे बाबतही साशंक ,कारण खरेतर आपण लायक नाही त्यामुळे स्तुती मध्ये मध्ये काहीतरी मेख असल्यासारखे वाटते.
– केवळ “माझ्याकडे बघा” हा ही मनोभूमिका जपण्याचा प्रयत्न.
* यावेळी ज्या व्यक्तीचा पालक जागृत होतो अशी व्यक्ती म्हणते ,”तुमच्याकडे बघा तुम्ही ठीक नाही.”
* ज्यांचा एडल्ट कार्यक्षम अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीतून सहीसलामत बाहेर येते, कार्यक्षम असते ,सामाजिक परिस्थिती व कौटुंबिक जीवनात उपयोगी.
@ फ्रेंड्स ! आपला” प्रौढ “कार्यक्षम कसा होईल ?
* पालक-बालक उत्तेजित झाल्याचे संकेत ओळखा. भावना उद्दीपित होणे हे त्याचे लक्षण आहे.
* बालकाला जाणून घेऊन, “ठीक नाही” भावना समजून घेतल्या तर कृतीमधून त्या व्यक्त न होऊ देणे शक्य होईल यासाठी केवळ काही क्षणांचा अवधी लागतो.
*10 अाकडे मोजुन शंका असल्यास सोडून द्या. लेट गो.
* सेल्फ टॉक वाढवा.
*इतरां मधील बालक ओळखा, प्रेमाने बोलून परिस्थिती हॅण्डल करा.
*भरपूर विचारांती आधारभूत मुल्याबाबतचे निर्णय घेऊन ठेवा,जेणे करुन अनेक छोटे छोटे निर्णय घ्यायची गरज पडत नाही.
*सारासार विवेकबुद्धी ने विचार होईपर्यंत , प्रतिक्रिया देऊ नका.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button