दिलासादायक : राज्यात २४ तासांत ७१,७३६ जणांनी केली कोरोनावर मात

Maharashtra Coronavirus

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांची (Corona) संख्या वाढत चालली आहे. परंतु आता राज्यातून एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या मोठी आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ७१,७३६ जणांनी कोरोनावर मात केली. तर ४८,७०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे २४ तासांत ५२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

गेल्या २४ तासांत राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनामुक्त नागरिकांची नोंद झाली आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४३,४३,७२७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३६,०१,७९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,७४,७७० जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ८२.९२ टक्क्यांवर पोहचला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button