कोल्हापुरात दिलासादायक वर्दळ : व्यवहार पूर्वपदावर

Kolhapur Market

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आज, मोजके व्यापार वगळता सर्व व्यवहार सुरू झाले. ऑटो रिक्षा आणि लालपरी ही सार्वजानिक वाहतुक व्यवस्था २२ मार्चनंतर प्रथमच सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर धावली. शहरातील समविषयम नियम वगळून सर्व दुकाने सुरू झाली. प्रतिबंध उठल्याने शहरात सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत दिलासादायक वर्दळ दिसत होती. कोरोना महामारीबाबत योग्य ती काळजी घेत सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्याचे चित्रशहरात रविवारी दिसत आहे.

देशभरात लागू केलेला जनता कर्फ्यु आणि त्यानंतरची संचारबंदी-लॉकडाऊन यामुळे जिल्ह्यातील उद्योग व्यापाराची चक्रे थांबली होती. ५ मेनंतर तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये काही अंशी उद्योग व्यापार सुरू झाला. शहरातील ओस पडलेले रस्ते ग्राहकांनी फुलू लागले. यानंतर आजपासून जवळपास सर्वच दुकाने आणि व्यापार सुरू करण्याची मुभा मिळाली. ऑटो रिक्षा, एसटीबसेस, सलून, हातगाडी आदी प्रतिबंधित घटकांना दिलासा मिळाला. एसटी स्टॅन्ड परिसरातील इतक्या दिवसांच्या शांततेची जागा प्रवाशांच्या वर्दळीने घेतली होती. चौका-चौकात ऑटो रिक्षा प्रवाशांसाठी सज्ज दिसत दिसत होत्या. सलून दुकानदारांनी कालपासूनच ग्राहकांचे फोनव्दार अपॉन्टमेन्ट निश्चित केल्या होत्या. यापूर्वीच कसबा बावडा रोड, कळंबा, स्टेशनरोड, लक्ष्मीपूरी, शाहूपूरी, स्टेशन राेड, विद्यापीठ रोड आदी ठिकाणी फळ विक्रेत्यांनी रस्त्याकडेला स्टॉल्सची मांडणी केल्याचे दिसत होते.

भाजी मंडई परिसरात यापूर्वी असणारी वर्दळ आता शहराच्या कानाकोपऱ्यातही दिसत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या निमित्ताने थांबलेली शहराचे व्यापार चक्र आता खऱ्या अर्थाने पुन्हा जोमाने सुरु होत असल्याचे दिसलादायक चित्र आहे. शहरात पुण्या मुंबईतून आलेल्यांमुळे कोरोनाचा रुग्णांचा आकडा वाढत असल्याची चिंताही शहरवासीयांत आहे. कोरोना सोबत जगायचे आहे, प्रतिबंधित उपाय करत कोरोनावर मात करण्याचा निर्धार करुन लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. मैदानावर वर्दळ वाढत आहे. मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉकवर यापूर्वी निर्बंध होते ते शिथील झाल्याने नागरिक मोठ्या संख्येने सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडले. एसटी, ऑटो रिक्षा आणि सलून सेंटरमध्ये तुरळक गर्दी असली तरी बंद असलेले हे घटक सुरू मोठ्या घटकांना दिलासा मिळाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER