राज्याला दिलासा; आज महाराष्ट्रात ५९, ५०० जण कोरोनामुक्त

Corona Virus

मुंबई :- राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्येच काहीशी घट झाली आहे. राज्यात आज ४८ हजार ६२१ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर ५९, ५०० रूग्ण कोरोनामुक्त (Corona) होऊन आपल्या घरी परतले आहेत. तर ५६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ६ लाख ५६ हजार ८७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ७० हजार ८५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४०,४१,१५८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) ८४.७ टक्के एवढा झाला आहे. दरम्यान, सध्या राज्यातील मत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७८,६४,४२६ प्रयोगशाळा नमुन्याांपैकी ४७,७१,०२२ (१७.१२ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,०८,४९१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,५९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button