‘कमबॅक क्वीन’ कॉरोलिना मुचोव्हाने दिला ‘नंबर वन’ बार्टीला धक्का

Carolina Muchova pushes Number One Barty

ऑस्ट्रेलियन ओपनला (Australian Open) 1978 नंतर पहिली स्थानिक विजेती मिळणे पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. जगातील नंबर वन ऑस्ट्रेलियाची अॕश्ली बार्टी (Ashley Barty) हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसलाय. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी शेवटची ऑस्ट्रेलियन टेनिसपटू म्हणून 1978 पासून असलेले ख्रीस ओनीलचे नाव कायम राहणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या या अतिशय अनपेक्षीत निकालात झेक गणराज्याच्या कॉरोलिना मुचोव्हा (Karolina Muchova) हिने नंबर वन बार्टीवर 1-6, 6-3, 6-2 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली आहे.

या सामन्यात एकावेळी मुचोव्हा 1-6, 0-2 अशी पिछाडीवर होती मात्र त्यानंतर तिने सामन्याला कलाटणी दिली परंतु दुसऱ्या सेटमध्ये 1-6, 1-2 अशी मुचोव्हाची स्थिती असताना तिने वैद्यकीय मदत मागितली आणि तब्बल 10 मिनीटांचा मेडीकल टाईम आउट (MTO) घेतला. कदाचित या व्यत्ययाने बार्टीची लय गेली आणि मजबूत स्थितीत असूनही तिने हा सामना गमावला. शेवटच्या दोन सेटमध्ये तिने चार वेळा सर्व्हिस गमावली.

यामुळे मुचोव्हाच्या कारकिर्दीतील मोठ्या यशाला गालबोट लागले असले तरी तिने स्वतःला ‘कमबॅक क्वीन’ सिध्द केले आहे. यंदाच्या आपल्या आठ सामन्यात तिने एकही सामना गमावलेला नाही आणि मेलबोर्नमध्ये तिने हा तिसरा सामना पिछाडीवरुन जिंकला आहे. तिसऱ्या फेरीत किकी मर्टेन्सविरूध्द तिने पहिल्या सेटमध्ये 0-4 असे मागे पडल्यावर 7-6, 7-5; चौथ्या फेरीत कॕरोलिना प्लिस्कोव्हाविरुध्द दुसऱ्या सेटमध्ये 0-5 असे मागे पडल्यावर 7-5, 7-5 असा विजय मिळवला आणि आता बार्टीला 1-6, 0-2 अशा पिछाडीवरुन मात दिली.

25 व्या मानांकित मुचोव्हाचा नंबर वन खेळाडूवर हा पहिलाच विजय आहे. तिचा उपांत्य सामना आता अमेरिकेच्या जेनिफर ब्रॕडी किंवा जेसिका पेगुला हिच्याशी होईल. यामुळे या गटातून कोणतीही खेळाडू अंतिम फेरीत पोहोचली तर ती पहिल्यांदाच आॕस्ट्रेलियन ओपन व एकूणच ग्रँड स्लॕम स्पर्धात पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचणारी खेळाडू असेल.

बार्टीविरुध्द सेट जिंकणारी पहिलीच खेळाडू ठरलेल्या मुचोव्हाची सुरुवात खराब झाली. तिने पहिला सेट 25 मिनिटातच 6-1 असा गमावला. पण दुसऱ्या सेटमधील ब्रेकनंतर सामन्याचे चित्रच पालटले. मुचोव्हाने पुढे नऊ पैकी आठ गेम जिंकले.

मुचोव्हाने याच्याआधी टॉप फाईव्हमधील एकाच खेळाडूवर विजय मिळवला होता. तिने 2019 च्या विम्बल्डनवेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॕरोलिना प्लिस्कोव्हाला मात दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER