राष्ट्रवादीच्या कार्यालयात या, आमच्या कामांचा ग्रंथ वाचायला देतो – अमोल मिटकरी

Amol Mitkari - Devendra Fadnavis

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) १ वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारच्या वर्षभरातील कामांचा एक ग्रंथ आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावे. त्यांना तो ग्रंथ वाचायला देतो, असा पलटवार अमोल मिटकरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर देतांना मिटकरी म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने आपला १ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करतो. सरकारमधील सर्व मंत्र्यांनी चांगले काम केले. सरकारने वर्षभरात महात्मा फुले कर्जमाफी योजना, शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत, कोरोना काळात शिवभोजन थाळी अशा अनेक योजना राबवल्या. राज्य सरकारच्या वर्षभरातील कामांचा एक ग्रंथ आहे. देवेंद्र फडणवीस यांना वेळ भेटला तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावे. त्यांना तो ग्रंथ वाचायला देतो, असे अमोल मिटकरी म्हणाले.

दरम्यान, आघाडी सरकारने काय केले?, हे विचारण्याचा देवेंद्र फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही. कारण, फडणवीस यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची फसवणूक झाली. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही, असा दावा करत महाविकास आघाडी सरकार हे पूर्ण ५ वर्षे टिकून राहील, असा दावाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER