शिवसेनेत या, पंकजा मुंडे यांना आमंत्रण

Arjun Khotkar - Pankaja Munde

मुंबई : पंकजा मुंडे (Pankaja Munde) आमच्या पक्षात आल्या तर आनंद आहे. त्यांच्यासाठी आमच्या पक्षाची दारे नेहमीच खुली आहेत. शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती करतो त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, या शब्दात शिवसेनेचे (Shiv Sena) नेते व माजी मंत्री अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांनी भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा याना शिवसेनेत प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की – भाजपाने जे पेरले तेच आता उगवते आहे. मागच्या पाच वर्षात भाजपाने मेगा भरती केली. आता भाजपाला (BJP) उतरती कळा लागली आहे. एकनाथ खडसेंसारखे मोठे नेते राष्ट्रवादीत जात आहेत. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. भारतीय जनता पक्षात अनेक प्रमुख नेते नाराज आहेत; त्यांनीही निर्णय घ्यावा आणि पक्षांतर करावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER