कम ऑन नेहा..

neha pendse

एखादी मालिका, सिनेमा, रियालिटी शो (Reality show) मध्ये सतत दिसणारा चेहरा अचानक पडद्यामागे जातो तेव्हा मग त्या कलाकाराच्या चाहत्यांमध्येच नव्हे तर असंख्य प्रेक्षकांच्या मनातही त्या कलाकाराचा कम बैक कधी होणार याची उत्सुकता नेहमी असते .यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच शार्दुल सिंह बरोबर लग्न करून कॅमेऱ्याच्या मागे गेलेली अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) बऱ्याच दिवसांनी ऑन स्क्रीन येणार आहे. त्यामुळे सहाजिकच तिचे चाहते सुखावले आहेत. नुकताच नेहाने एथ्निक स्टाइलमध्ये केलेले फोटोसेशन देखील तिच्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. आणि यात नेहा कमालीची सुंदर दिसते आहे. तिने फिटनेसवर ही गेल्या आठ महिन्यांत चांगलंच काम केल्याचं दिसून येत आहे.

Neha Pendse will marry on this day - Cine Talkersभाग्यलक्ष्मी या मालिकेतून नेहा पेंडसेचे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आगमन झालं. सोशिक सून हा मालिकेतील फ्रेंड भाग्यलक्ष्मी या मालिकेत दाखवण्यात आला होता. खरेतर नेहाची इमेज खूप बोल्ड आहे. परंतु तिने आपल्या करिअरची सुरुवात अत्यंत साध्या सासरच्या लोकांचा त्रास सहन करणाऱ्या सुनेच्या रूपात केली. त्यामुळे नेहा पुढे काय करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये होती. भाग्यलक्ष्मी मालिकेतील काशी ही व्यक्तिरेखा अत्यंत लोकप्रिय झाली होती. त्यानंतर ती तेलुगू मल्याळम अशा प्रादेशिक भाषांमधील सिनेमातही दिसली. बिग बॉस मधला मराठी चेहरा म्हणून नेहाने शंभर दिवस प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित करण्यात बाजी मारली होती.

मूळची मुंबईची असलेली नेहा पेंडसे शालेय वयापासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत होती. काही नाटक एकांकिका केल्यानंतर तिला टीव्ही मालिकेत संधी मिळाली. मध्यंतरी तिच्या काही बिनधास्त फोटोंमुळे देखील ती चर्चेत आली होती. तीचे स्टाइल स्टेटमेंट मध्ये काम करणाऱ्या माध्‍यमांमध्‍ये फोटोसेशन जोरात सुरू होते. जानेवारीमध्ये तिने शार्दुल सिंह यांच्या बरोबर लग्न केले या तिच्या लग्नाचे देखील अनेक व्हिडीओ फोटो तिच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. आता सात आठ महिन्याच्या विश्रांतीनंतर नंतर नेहा पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आणि तिचा जून नावाचा सिनेमा लवकरच पडद्यावर येणार आहे तसेच एका हिंदी सिनेमातही काम करत आहे .
गेल्याच महिन्यामध्ये जून या तिच्या नव्या सिनेमासाठी टीजर झळकला. सिद्धार्थ मेनन आणि किरण करमरकर हे कलाकारही तिच्यासोबत या सिनेमात दिसणार आहेत .

सध्या तरी न

जून या नावावरून तिच्या या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता आहे. आजपर्यंत आपण अशा पद्धतीच्या महिन्याचे नाव दर्शवणाऱ्या सिनेमा विषयी ऐकले होते आणि एका वेगळं फॅक्टर अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये असतो. सध्यातरी हा या सिनेमाविषयी किंवा या सिनेमातील तिच्या भूमिकेविषयी फार सांगू शकत नाही. पण एक वेगळी कथा घेऊन हा सिनेमा मराठी मध्ये आलेला आहे एवढेच सध्या तरी सांगू शकते. बरेच दिवस कॅमेरा समोर नसल्यामुळे सध्या नेहाला या नव्या सिनेमामुळे पुन्हा एकदा समोर येण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नेहादेखील खूपच खूश आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नेहाचे स्वतःदेखील प्रमोशन सुरू झाले आहे. यासाठी तिने नुकतेच ड्रेसिंग मॉडेल म्हणून देखील काम केले. नेहा पेंडसेचे वैशिष्ट म्हणजे तिला वेगवेगळ्या भाषा अवगत असल्यामुळे तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ही मराठीचे आस्तिव कायम ठेवत आपले नाव कमावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER