‘राजकारणात या, मी तुम्हाला संधी देणार’; राज ठाकरेंचे सर्वसामान्यांना वचन

Raj Thackeray

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. मागील काही दिवसांपासून मनसेत (MNS) मोठ्या प्रमाणात लोक मनसेसोबत जुळत असल्याचं दिसून येत आहे. मात्र आता मनसेत मेगा भरतीला(MNS Megabharti) सुरूवात झाली आहे. मनसेच्या १५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत पहिल्यांदाच मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे.

मनसेने १५ वर्षाच्या राजकीय वाटचालीत सदस्य नोंदणीची जाहिरात दिलेली असून, आज सकाळी राज ठाकरे यांनी सहकुटुंबासमवेत सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ केला. शिवाजी पार्क येथे राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते या मोहिमेचा श्रीगणेशा झाला. मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करत विविध क्षेत्राशी जुळलेल्या लोकांना मनसेचे सदस्यत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. विविध क्षेत्रांतील क्रियाशील, सृजनशील जनांनो राजकारणात या, मी तुम्हाला संधी (Come into politics, I’ll give you a chance’) द्यायला तयार आहे!,

पक्षाची सदस्य नोंदणी सुरु झाली आहे. ऑनलाईन सदस्य नोंदणीसाठी :https://mnsnondani.in ला भेट द्या किंवा पक्षाच्या स्थानिक शाखेशी संपर्क साधा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, सदस्यत्व मोहिमेच्या उदघाटनानंतर काही वेळातच शेकडो लोकांनी मनसेचे सदस्यत्व स्वीकारल्याचे दिसून आले. त्यामुळे काही दिवसात मनसेच्या सदस्य संख्येमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही बातमी पण वाचा : अरे बघताय काय सामील व्हा’; 15 वर्षात पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या मनसेत ‘मेगाभरती’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER