आ देखें जरा, किसमें कितना है दम …, नोटीसवर संजय राऊत यांनी दिले आव्हान

Sanjay Raut

मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावल्याची माहिती आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करून आव्हान दिले आहे – आ देखें जरा, किसमें कितना है दम …

ही बातमी पण वाचा : केंद्र राज्यातील वितुष्टामुळे देशाचे तुकडे होतील, संजय राऊत याना वाटते भीती 

वर्षा राऊत यांना २९ डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात आपणास काही कल्पना नाही, असे संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. मात्र, लगेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन

गाण्याच्या ओळी शेअर केल्या –

आ देखें जरा, किसमें कितना है दम

जमके रखना कदम, मेरे साथी आ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER