आकर्षक दिसण्यासाठी ‘कलरफुल जीन्स’

फॅशन ट्रेंड मध्ये जीन्सला सर्वाधिक पसंत केले जाते. यात ब्लू आणि ब्लॅॅक जीन्स तर काॅॅमनच असतात. पण सध्या या व्यतिरिक्त मार्केट मध्ये  ‘कलरफुल जीन्स’चे  भरपूर पर्याय  बघायला मिळतील. यात उन्हाळा ही आलाय. त्यामुळे अशे कलरफुल जीन्स सर्वात बेस्ट. पण हे घेतांना तुम्ही कोणती काळजी घ्याल हे बघूया….

  • कलर फुल जीन्स निवडतांना आपल्या कलर टोनचा विचार करावा. त्यावर कोणता टाॅॅप, शर्ट शोभेल याचा विचार करावा.

  • कलर फुल जीन्स वर तुम्ही कुर्ती सोबत देखील पेअर अप करू शकता. लेगिंग पेक्षा जास्त शोभून दिसेल.

  • आॅफिससाठी जर डार्क रंगाची जीन्स निवडली तर एखादा चेक्स किंवा प्लेन टॉप किंवा टि-शर्ट वापरावा.

  • फिक्या रंगाची जीन्स असल्यास त्यावर फ्लोरल प्रिंटचा एखादा टॉप फ्रेश लूक देतो. न्यूट्रल कलर जसे की सफेद, ग्रे अशा कलरच्या टॉप वर डार्क कलरच्या जीन्स सूट होतात.

  • सर्वात महत्वाच म्हणजे जीन्स घेतांना फिटिंग किंवा कलर सोबत डिझाईन व स्टायलिंगचा देखील विचार करावा.