दोन वर्षांपुर्वी हरवलेली कोलंबियन महिला समुद्रात जिवंत तरंगताना आढळली

Colombian woman missing for two years found floating alive in sea

कोलंबिया :- एएक म्हण आहे ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच एक प्रत्यय कोलंबियात आला आहे. कोलंबियामधील एक 46 वर्षीय महिला, 2018 पासून बेपत्ता आहे. ती महिला कोलंबियाच्या किना-यापासून  काही किलोमीटर अंतरावर दोन मच्छिमारांना शनिवारी तरंगताना आढळून आली. ती समुद्रात जीवंत असल्याचे मच्छिमारांच्या निदर्शनास आले. त्या महिलेने मदतीसाठी हात उंचावले असता मच्छीमार आश्चर्यचकित झाले. आणि त्यांनी तिला पाण्याबाहेर काढले.

प्राप्त वृत्तानुसार, दोन वर्षांपासून आपण आपल्या आईला पाहिली नसल्याचे तिच्या मुलींनी सांगितले. ती महिला 26 सप्टेंबर रोजी रोलांडो व्हिसाबुल नावाच्या मच्छीमाराला समुद्रात जीवंत तरंगताना आढळली. 46 वर्षीय वृद्ध व्यक्तीला पोर्तो कोलंबियाच्या किनार्यापासून 1.5 कि.मी. अंतरावर तरंगताना त्याने पाहिले. त्याने ताबडतोब तिला पाण्यातून बाहेर काढण्यात यस मिळवले.

या महिलेचे नाव एंजेलिका गाय़तान असे सांगण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार व्हिसबलने तिला कोलंबियाच्या किना-यावर पाहिले तव्हा ती पाण्यात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करत होती.  सोशल मीडियावर शेअर केलेल्या क्लिपमध्ये व्हिस्बल आणि त्याचा मित्र गायतानाला त्यांच्या बोटीत खेचत असल्याचे दिसून आले. समुद्रावर आठ तास घालविल्यानंतर ती प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले.

तिला किना-यावर आणण्यापुर्वी हे लोक तिला पिण्यासाठी पाणी देताना या व्हिडिओत दिसत आहेत. ती महिला या दोन पुरुषांच्या सहाय्याने चालताना दिसत आहे. मग तिला खुर्तीवर बसवण्यात आले आहे.  त्यानंतर तिला रूग्णालयात नेण्यात आले असून ती आठ तासांपेक्षा जास्त वेळ  पाण्यात राहिल्याने तिला  तिला हायपोथर्मियाचा त्रास झाल्याचे समजते.या पीडित महिलेने पत्रकारांना सांगितले की, कटुंबातील त्रासामुळे ती वैतागली होती.तिचा नवरा तिला त्रास द्यायचा. तिने सांगितले की तिच्या पहिल्या नव-याने तिला घरात बंद करून ठेवले होते आणि बंद घरातच तिला शौचास जाण्यासही सक्ती कली होती.

2018 च्या सुरूवातीला, ती आपल्या पतीपासून पळून जाण्यात यशस्वी झाली परंतु सहा महिन्यांपर्यंत ती रस्त्यावरच राहिली. त्यानंतर सुदैवाने तिला एका बचाव केंद्रात राहायला एक जागा मिळाली.

पण तिचा त्रास इथेही संपला नाही तेथेही तिला अत्याचार सहन करावा लागला. “तिच्यावर अत्याचार करणार्‍याने शहर सोडले आहे” अशी बातमी साइट डायओरा ला लिबर्टॅडने दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला केमिनो डी फे बचाव केंद्रात सोडले तेव्हा तिने स्वतःचं जीवन संपवण्याचे कठोर पाऊल उचलण्याचे ठरवले. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे ती वाचली. मच्छीमारांना तिला वाचवण्यात यश आले.

Source :- Times Now

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER