लस घेतल्यानंतर २ आठवड्याने जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

Collector Corona positive 2 weeks after vaccination

उस्मानाबाद : उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Kaustubh Divegavkar) याना लस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी कोरोना ( Corona positive) झाला. सध्या ते ‘होम क्वारंटाइन’ असून घरीच उपचार घेत आहेत. या महिन्याच्या सुरुवातील जिल्हाधिकाऱ्यांनी ‘कोवॅक्सिन’चा पहिला डोस घेतला होता.

कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना झाल्यानंतर ही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नये यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करणार आहेत. जिल्हाधिकारी यांना अंगात ताप असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता.

दिवेगावकर यांनी लिहिलेल्या संदेशानुसार, मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. सांगितल्यावर मास्क लावत. पण माझ्याबाबतीत तोवर व्हायचा तो परिणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे ‘नो मास्क नो एन्ट्री’ मास्क तोंडावरून खाली ओढून बोलणे यावर कडक कार्यवाही आवश्यक आहे . मी दोन आठवड्यापूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण कोरोना विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात. सर्व फ्रंट लाईन वर्कर्स – महसूल, आरोग्य, पोलीस यांनी अत्यंत सावध राहावे. कोणतेही लक्षण दिसताच तपासणी करून घ्या.

पुढे ते म्हणाले की, मला आनंद आहे की उस्मानाबाद जिल्ह्यात मागील ६ महिन्यात ज्या सोयी सुविधा आपण शासकीय रुग्णालयांत निर्माण केल्या त्याचाच लाभ मलाही मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER