विविध मागण्यांसाठी ससूनच्या डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन

विविध मागण्यांसाठी ससूनच्या डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन

पुणे : सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करा आणि अस्थायी सहायक प्राध्यापकांना कायम करा, या मागण्यांसाठी ससूनमधील डॉक्टर आणि सहायक प्राध्यापकांनी आज सामूहिक रजा आंदोलन केले.

कोरोनाच्या (Corona) साथीच्या काळात डॉक्टर-नर्सेस सतत काम करत असताना आमच्यावर अन्याय होतो आहे, अशी भावना या डॉक्टरांनी व्यक्त केली. अस्थायी सहायक प्राध्यापकांना काम इतरांच्याच इतके करावे लागते; मात्र त्यांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने होते. अशा प्रकारे काही कर्मचारी चार- पाच वर्षांपासून काम करत आहेत व त्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते. ससूनमध्ये ६९ सहायक प्राध्यापक आहेत. आजच्या आंदोलनात राज्यातील सुमारे ५०० अस्थायी सहायक प्राध्यापकांनी भाग घेतला, असा दावा या निदर्शकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER