थंडी झाली गायब :आठवड्याची प्रतीक्षा

Cold and foggy waves in the chiplun

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागात कोरडे हवामान राहणार आहे. त्यानंतर बुधवारपासून (दि. २५) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. २६ नोव्हेंबरला मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल. २७ नोव्हेंबरलाही या दोन्ही विभागांत पावसाचा इशारा असून, २६, २७ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या वातावरणाचा राज्यातील वातावरणावरही परिणाम जाणवणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली. मात्र चार दिवसांतच थंडी गायब झाली.

ढगाळ वातावरण, दिवसभर कडक उन्ह, रात्री उबदार वारा असे गेली दोन आठवडे वातावरण आहे. किमान तापमान २२ तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आहे. अजून आठवडाभर पारा चढाच राहणार असल्याचे हवामान खात्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने काढता पाय घेतल्यानंतर वातावरणात बदल जाणवू लागला होता. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सहा ते आठ अंशांनी पारा घसरल्याने यंदा कडक हिवाळ्याचा अनुभव येणार असल्याचा अनेकांनी अंदाज बांधला. मात्र, दिवाळीपूर्वीच तापमानात एकदमच बदल झाला.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन आंध्रप्रदेश, तेलंगणासह राज्यात बाष्पाचा पुरवठा झाला. त्यामुळे काही भागांत पाऊस झाला. त्यामुळे राज्यभरातील तापमानात लक्षणीय वाढ झाली. नुकताच पावसाळा संपला आहे. आर्द्रता  कमी होऊन हवेत गारठा वाढत असतानाच आता पुन्हा काही दिवस थंडीसाठी कोल्हापूरकरांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. थंडी गायब झाली असली तरी उबदार वातावरण आहे. सकाळी अनेक वेळा धुके पडते. रात्री तुलनेत गार वारा असतो. अशा वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. विषम वातावरणामुळे सर्दी खोकला, ताप आदी आजारांचे रुग्ण वाढण्याचा धोका असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER