शीतल दामा मृत्यू : कारवाईसाठी आंदोलन; किरीट सोमय्या यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Kirit Somaiya

मुंबई : मॅनहोल व्यवस्थित नसल्याने गटारात पडून शीतल दामा (३२) यांच्या  मृत्युप्रकरणी दोषी अधिकऱ्यांवर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना  पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी निदर्शकांची पोलिसांशी बाचाबाची झाली. सोमय्या यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात नेले आहे. सोमय्या यांनी ट्विट करून दुपारी १२ वाजता घाटकोपरमध्ये चिराग नगर पोलीस स्टेशनबाहेर शीतल यांच्या कुटुंबासोबत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी १२ दिवसांनंतरही एफआयआर दाखल केला नाही, असा आरोप त्यांनी केला. शीतल यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी सोमय्या यांनी केली.

घटना

घाटकोपरमधील असल्फा गावात राहणाऱ्या शीतल (३२) पीठ आणण्यासाठी चक्कीवर गेल्या होत्या. त्या परत न आल्याने शोधाशोध सुरू झाली. नालीजवळ पिठाची पिशवी सापडली. नालीच्या मॅनहोलचे झाकण उचकटले होते. त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. मॅनहोलवर झाकण नसल्याने शीतल नाल्यात पडल्या आणि मृत्यू झाला, असे सांगितले जाते आहे. हाजीअलीजवळ त्यांचे शव सापडले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. कुणी असल्फा येथील छोट्या  नाल्यात पडले तर शव वरळी-हाजीअलीपर्यंत वाहून येऊच शकत नाही, असे निरीक्षण महापालिका अधिकाऱ्यांनी नोंदवल्यानंतर शीतल यांच्यावर नेमका काय प्रसंग बेतला, त्यांचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट करणे पोलिसांसाठीही आव्हान ठरते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER