उपमुख्यमंत्रीपद गेल्यावर तुमच्याकडे नारळ पाणी विकणारा पण येणार नाही, निलेश राणेंचा अजितदादांना टोला

Maharashtra Today

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते, याची माहिती घ्यावी असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मात्र भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane)यांनी ट्विट करत अजित पवार(Ajit Pawar)यांना जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्या विधानाची हवाच काढली आहे.

‘अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपचे आमदार येतात ते पहा. पवार साहेब ते तुमच्याकडे नाही ही तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल त्यादिवशी आमदार सोडा नारळ पाणी विकणारा पण तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, विचार करून बोललं पाहिजे’, असा मिस्कील टोला निलेश राणे यांनी अजित पवारांना लगावला.

तसेच आज पहाटे विरार येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेवर दुःख व्यक्त करत त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांना प्राण गमवावे लागले. ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : भाजपचे किती नेते मला भेटले याची माहिती घ्या ; अजित पवारांचा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button