शेकरूंच्या संवर्धनासाठी नारळाची बाग केली ‘राखीव क्षेत्र’!

शेकरू राखीव क्षेत्र - डॉ. रुपेश पाटकर

सिंधुदुर्ग : मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी त्यांची नारळाची बाग शेकरुंच्या संवर्धनासाठी राखीव क्षेत्र घोषित केली आहे!

डॉ. रुपेश पाटकर (Dr. Rupesh Patkar ) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील बांदा गावातील गवळीटेंब येथे राहतात. हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर आहे. ते सकाळी गोव्याला जाऊन संध्याकाळी महाराष्ट्रात परतात. गवळीटेंबमध्ये ८ एकरात त्यांची नारळाची बाग आहे. या बागेत पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ शेकरूचा अधिवास आहे. शेकरूच्या दोन ते तीन जोड्या या बागेत राहतात. या बागेला डॉ. पाटकरांनी आता ‘शेकरू राखीव क्षेत्र’ म्हणून आरक्षित केले आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, लोक बागेत आलेल्या शेकरूला मारतात किंवा त्याची शिकार करतात. त्यामुळे शेकरू दुर्मिळ होत चालला आहे. शेकरू नारळाची शहाळी खातात. त्यामुळे नारळाच्या बागेत शेकरू आले तर लोक त्याची शिकारी करतात. पण, डॉ. पाटकर यांनी पुढाकार घेऊन शेकरूसाठी स्वतःची खाजगी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. शिकाऱ्यांना समज देत डॉक्टरांनी आपल्या बागेभोवती ‘शेकरू राखीव क्षेत्रा’चा फलक लावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER