कोको गॉफची सव्वा वर्षात 686 ते 49 व्या स्थानापर्यंत प्रगती

अमेरिकेची उगवती प्रतिभावान टेनिसपटू

Coco Gauff

कोको गॉफ हिने क्रमवारीत पहिल्या पन्नासात स्थान मिळवून नवा विक्रम केला आहे. कोको ही अवघ्या 15 वर्षांची असून 2005 नंतर प्रथमच महिला एकेरीच्या क्रमवारीत पहिल्या 50 मध्ये एवढ्या कमी वयाच्या खेळाडूने स्थान मिळवले आहे. ताज्या क्रमवारीत कोको 49 व्या स्थानी आहे. यापूर्वी 2005 मध्ये एवढ्या कमी वयात सेसील केरातान्चेव्हा हिने पहिल्या पन्नासात स्थान मिळवले होते.

कोको ही 1990 नंतर टॉप 50 मध्ये पोहचलेलेली अमेरिकेची पहिलीच 15 वर्षाआतील खेळाडू आहे. 1990 मध्ये जेनिफर कॅप्रियातीने 14 वर्ष 11 दिवस वयातच टॉप फिफ्टीमध्ये स्थान मिळवले होते.

कोकोने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तृतीय मानांकित नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का दिला होता. तेंव्हाच ती पहिल्या पन्नासात स्थान मिळवेल असा अंदाज होता. कोकोने गेल्यावर्षी आपल्या ग्रँड स्लॅम पदार्पणातच व्हिनस विल्यम्ससारख्या दिग्गज खेळाडूला पराभवाचा धक्का देत लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी विम्बल्डनची तिने चौथी फेरी गाठली होती. गेल्यावर्षिच तिने लिंझ येथील स्पर्धा जिंकली होती.

कोको 2018 च्या अखेरीला क्रमवारीत 686 व्या स्थानी होती. 2019 च्या अखेरीला तिने 68 व्या स्थानापर्यंत प्रगति केली होती आणि आता ती 49 व्या स्थानी आहे.

कोको येत्या मार्चमध्ये 16 वर्षांची होईल. त्यामुळे तिच्यावरील स्पर्धा सहभागांचे निर्बंध हटतील. त्यानंतर ती मर्जीनुसार स्पर्धात सहभागी होऊ शकणार असल्याने ती यंदाच टॉप टेनमध्ये पोहचू शकेल असा जाणकारांचा अंदाज आहे.

सुमीत नागल बनला भारताचा नंबर वन टेनिसपटू