कोळसा घोटाळा प्रकरण : माजी कोळसा सचिव एच.सी.गुप्ता दोषी

नवी दिल्ली : मध्य प्रदेश येथील थेसगोडा-बी रुद्रपुरी कोळसा खाणीतील घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच.सी.गुप्ता यांना दोषी ठरवले. गुप्ता यांच्यासह तत्कालीन संयुक्त सचिव के.एस.क्रोफा, तत्कालीन अध्यक्ष के.सी.समारिया यांना देखील दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. या सर्वांना २२ मे रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

दरम्यान,’ एच.सी.गुप्ता हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये दोन वर्ष सचिवपदावर होते. त्यांनी ४० कोळसा खाणींचे या पदावर असताना वाटप केले होते. या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या केएसएसपीएल कंपनीचे पवन कुमार अहलूवालिया यांना देखील न्यायालयाने दोषी ठरवले आहे.