सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

co-operative-societies For elections-plan-

मुंबई :  राज्यातील सुमारे ४५ हजार सहकारी संस्थांच्या (co-operative-societies ) ३१ मार्चनंतर निवडणुका घेण्याचा १६ जानेवारी २०२१चा आदेश राज्य शासनाने मंगळवारी मागे घेतला. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानंतर निवडणुकांची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून होण्याची शक्यता आहे. ज्या टप्प्यावर निवडणुका स्थगित झाल्या होत्या तेथून पुढे पुढे निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार व पणन विभागाने काढले आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठी २७ जानेवारी २०२० ला तीन महिन्यांसाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या.

कोरोना महामारीचे संकट आल्याने १८ मार्च २०२०ला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. ही मुदत १७ सप्टेंबर २०२० रोजी संपली होती. पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. दरम्यान, प्राधिकरणाने १२ जानेवारी २०२१ ला आदेश काढून १८जानेवारीपासून निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली. मात्र, राज्य शासनाने ३१ मार्चनंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा १६ जानेवारीला आदेश दिला.

आता हाच आदेश मागे घेत निवडणुकांची तयारी करण्याचा नवा शासन आदेश काढला आहे. त्यामुळे राज्यातील २०१९ अखेर १३ हजार ३५८ तर २०२० अखेर ३१ हजार ९१८ व सन २०२१ अखेर १९ हजार ७१९ अशा एकूण ६४ हजार ९९५ संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER