मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’; अतुल भातखळकर यांचा टोमणा

Uddhav Thackeray & Atul Bhatkhalkar

मुंबई : ”कोणाचंही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) मिरवण म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारख आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’… फुकटच्या टीमक्या..” या शब्दात भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला.

महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेल महाराष्ट्राच्या बदनामीच कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावल आहे. आपण सगळे करोनाशी लढा देत असताना, संकटाशी लढत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी; होय, मी हा शब्द मुद्दाम वापरतो आहे, बदनामीचा कट केला होता. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था कोलमडली आहे, इथे अंमली पदार्थांची शेती होते आहे असं चित्र निर्माण केल. मात्र त्यांच हे कारस्थान आपण उधळून लावल अस आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधताना म्हटल होत.

यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून उत्तर दिल – ”कोणाचंही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवण म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारख आहे. त्यांनी सरळ सरळ महाराष्ट्रद्वेष्टे कोण आहेत? त्यांची नाव घेतली असती, तर थोड अधिक बर झाल असत. परंतु कायद्याचा गैरवापर करून लोकांना आपण तुरूंगात टाकतो आहे. त्यांना मारहाण करतो आहे, हे न ओळखण्या इतकी महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही.”

”आरे कॉलनीतील कारशेडचा निर्णय योग्य वेळेला जनतेला सांगू, योग्य वेळ कधी येणार? तुमच्याच सरकारने नेमलेल्या सवलत समितीने आरेमध्येच कारशेड करा हे सांगितल, यावर तुमच उत्तर काय? या समितीचा रिपोर्ट तुम्ही जनतेसाठी खुला का करत नाहीत? एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कधी देणार? शेतकऱ्यांना मदत कधी पोहचणार? मंदिरं कधी उघडणार? या लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांची उत्तर न देता, त्याच लक्ष अन्य गोष्टींकडे वळण्याकरता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळला, असा बागुलबुवा मुख्यमंत्री निर्माण करत आहात.” असा आरोप भातखळकर यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER