मुख्यमंत्र्यांचे दसरा मेळाव्यातले भाषण होते निर्बुद्ध बरळणे – नारायण राणे यांची टीका

narayank-rane-and-uddhav-thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंने (Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यात केलेलं भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणे होते. हा माणूस मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचा नाही, या शब्दात भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan rane) यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली.

पत्र परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. म्हणाले – ४७ शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्यात उद्धव ठाकरेने भाषण केले. त्यांच्या भाषणात काहीही ताळमेळ नव्हता. शेतकऱ्यांचे प्रश्न, कोणत्याही योजना, करोनाचं संकट याबाबत काहीही बोलला नाही. मुख्यमंत्र्यांना काय बोलावे कसे बोलावे हे अजून कळत नाही. करोनामुळे महाराष्ट्रात ४३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? असाही प्रश्न नारायण राणे यांनी विचारला.

महाराष्ट्राशी बेईमानी करुन हा माणूस मुख्यमंत्री झाला. ५६ जागा मिळाल्या तरीही मुख्यमंत्री झाला! सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. मोदींचे नाव घेऊन निवडणूक जिंकली आणि सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. सुशांतप्रकरणी स्वतःच्या मुलाला क्लिन चीट दिली. मात्र सुशांतने आत्महत्या केलेली नाही. सुशांतचा खूनच झाला आहे याप्रकरणी एक दिवस आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार आहे.

हा माणूस मला आणि माझ्या मुलांना बेडुक म्हणतो ? हा पुळचट माणूस आहे, अशीही टीका नारायण राणे यांनी केली.

मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो, आमच्यासारख्या शिवसैनिकांनी त्यावेळी शिवसेना उभी केली. केसेस अंगावर घेतल्या, स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणाला कानाखाली तरी दिली आहे का? कालचे दसरा मेळाव्यातले उद्धव ठाकरेंचे भाषण शिवराळ होते. एका मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. हा वाघाची भाषा करणारा शेळपट माणूस आहे.

ही बातमी पण वाचा :  मुख्यमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंचा बचाव, म्हणजेच दाल में कुछ काला है!; नितेश राणेंचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER