मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या चालकाला लुटले

मुंबई: नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथील गजाननकृपा पेट्रोलियम या पैट्रोलपंपावर रात्रीच्या वेळी सरकारी वाहनात झोपलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सचिन सागर मोरे यांच्या वाहनाचा चालक अरुण गौतम भोले यास अज्ञात इसमानी सोमवारी पहाटे मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime case) करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक सागर मोरे यांचे सरकारी वाहनाचा (क्र. एम एच ०३ डी ए ७०८) चालक अरूण गौतम भोले ( रा. वाशी नाका, न्यू आर्यन पार्क माउस रोड बिल्डींग, चेंबूर, मुंबई) हा रविवारी सरकारी वाहनासह त्याच्या गावी बीड येथे गेला होता. तेथील काम आटोपून रात्री तो मुंबईकडे जाण्यासाठी निघाला असता उशिर झाल्याने नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथील समिर आंबे यांचा गणेश कृपा पेट्रोलियम या पंपावर गाडी लाऊन भोले हा रात्री साडेबाराच्या सुमारास झोपला.

पहाटे 4 च्या सुमारास अज्ञात तीन चोरटे वाहनाजवळ आले. काचेवर आवाज करून त्यांनी भोले यांना उठविले. वाहनातून बाहेर येण्यास भाग पाडून चोरटयांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. भोले यांच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चेन काढून घेत खिशातील सात हजार २०० रूपयेदेखील चोरटयांनी काढून घेतले. तैथून जाताना त्यांनी सरकारी वाहनाची चावीही ताब्यात घेतली.

भोले यांना लुटल्यानंतर सुपे परिसरातील दौलत पंपाजवळ त्याच चौरटयांनी संजय ठकाजी नानीर (रा. डिग्रस, राहूरी) या पिकअप चालकास आडवून त्यास मारहाण करीत त्याच्या जवळीत चार हजार रूपये काढून घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER