मुख्यमंत्र्यांचा दुसऱ्या लाटेचा अंदाज अचूक ठरला, पण… भाजप नेत्याची टीका

madhav Bhandari - Uddhav Thackeray - Maharastra Today
madhav Bhandari - Uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गेल्या पाच महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यांचा हा अंदाज अचूक ठरला आहे. पण अंदाज वर्तवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या पाच महिन्यांत कोरोना (Corona) रोखण्यासाठी काय तयारी केली ते सांगा, असा सवाल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी केला आहे.

गेल्या वर्षी राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ नोव्हेंबर २०२० रोजी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, जनतेने सहकार्य केले म्हणून कोरोना रुग्णांचा फुगत चाललेला आकडा जरूर खाली आणला. पण कोरोनाचे संकट संपले असू समजू नका. पाश्चात्त्य देशांचा विचार केला तर दुसरी-तिसरी लाट येते आहे. पहिल्या लाटेशी तुलना केली तर ही लाट त्सुनामी आहे की काय, अशी भीती वाटते. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भीती पाच महिन्यांनी महाराष्ट्रात शब्दशः खरी ठरल्याचे दिसते. त्याचप्रमाणे दोन महिन्यांपूर्वी २२ फेब्रुवारी २०२१ च्या फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली का हे आठ-दहा दिवसांत कळेल, असे म्हटले होते, असे भंडारी यांनी सांगितले.

दुसऱ्या लाटेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अचूक अंदाज होता हे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसते. त्यामुळेच, इतकी पूर्वकल्पना असताना गेल्या पाच महिन्यांत  राज्य सरकारने दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काय तयारी केली याची माहिती आता जनतेला दिली पाहिजे. कोरोनावरील उपचारात रेमडेसिवीरचा उपयोग होतो हे गेल्या वर्षी पहिल्या लाटेतच ध्यानात आले होते. हे ध्यानात घेऊन पाच महिन्यांत  रेमडेसिवीर उपलब्ध करून घेण्यासाठीही पुरेशी तयारी करता आली असती, असेही त्यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : कोरोनाविरुद्धची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकणार; मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button