‘निर्बंध आणखी कठोर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना’; मुंबई आयुक्तांकडून नागरिकांना आवाहन

Lockdown - Hemant Nagrale

मुंबई : वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही मुंबईसह अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. हे पाहून आणखी कठोर निर्बंध लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे.

आणखी कठोर निर्बंधांच्या सूचना
आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की, “राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) लावला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मागच्या वेळी वाहतुक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. अजूनही काही जण या सूचनांचा विचार न करता घराबाहेर पडत आहेत. यामुळे आणखी निर्बंध कठोर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. तसेच सूचना स्थानिक पोलिसांना दिले आहेत.

“पोलीसांना संयमाने काम करण्याच्या सूचना आहेत. पण त्यांना कडक पावले उचलण्याची वेळ येऊ देऊ नका. नागरिकांनी नियमांचे पालन करा आणि पोलिसांना सहकार्य करा. आपल्याकडे मर्यादित पोलीस फोर्स आहेत. रात्रंदिवस पोलीस काम करत आहेत. माझे जनतेला आवाहन आहे की, तुमच्याकडून जी मदत असेल ती पोलिसांना द्या. पाणी, चहा, शक्य झाले तर काही खायला द्या. पोलिसांकडे डब्बे आहेत, पण सामाजिक भावनेच्या जाणिवेतून तुम्ही त्यांना पाठबळ द्या.” असे आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button