मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत

Rajesh Tope - CM Uddhav Thackeray

भंडारा :- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील (Bhandara District General Hospital) अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

याचबरोबर, या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.

ही बातमी पण वाचा : भंडारा जिला रुग्णालयातील नवजात बालकांच्या वार्डात आगीने 10 नवजात दगावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER