शीतयुद्धात मुख्यमंत्र्यांची हार; राष्ट्रवादी १ नंबरवर तर शिवसेना शून्यावर- अतुल भातखळकर

Jayant Patil - Uddhav Thackeray - Atul Bhatkhalkar

मुंबई :- राज्य मंत्रिमंडळाच्या १२ मे रोजी झालेल्या बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्यावर संतापले होते. जलसंपदा विभागाच्या आधीच मंजूर प्रकल्पांची यादी मंजुरीसाठी पुन्हा वित्त विभागाकडे कशासाठी पाठवली? असे होणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असा संतप्त सूर जयंत पाटील लावत त्यांनी कुंटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता जलसंपदा प्रकल्पांच्या कामांच्या यादीला अखेर प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) त्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. आणि याच मुद्द्यावरून भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

राष्ट्रवादीच्या (NCP) हटवादासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झुकावे लागले. जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना अखेर प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. शीतयुद्धात मुख्यमंत्र्यांची हार, तर राष्ट्रवादी १ नंबरवर तर शिवसेना (Shiv Sena) शून्यावर, असे म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button