बलात्कार अन् छेड काढणाऱ्या आरोपींबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा मोठा निर्णय

CM Yogi Adityanath

लखनऊ : बलात्कार आणि महिलांवर (Rape and Molestation) होणारे अत्याचार रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जर यूपीमध्ये कोणत्याही महिलेसोबत जर छेडछाडीचे प्रकार घडले, त्या आरोपीला पकडल्यानंतर त्याचे पोस्टर्स संपूर्ण शहरात लावण्यात येणार आहेत.

मिशन गैरवर्तन अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचारी शहरातील चौकाचौकात नजर ठेवतील,

योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना याबाबतचे आदेश दिले आहेत. महिलांची छेड काढणाऱ्यांविरोधात कडक पाऊलं उचलून दोषींवर कारवाई करावी. त्याचसोबत यात जे गुन्हेगार दोषी आढळतील त्यांचे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी योगी सरकारने हे पाऊल उचललं आहे. जे आरोपी असतील त्यांचे पोस्टर्स लावून त्यांची बदनामी करण्यात येईल. शहरातील प्रत्येक चौकाचौकात हे पोस्टर्स लावण्यात येतील. या आरोपींबद्दल संपूर्ण शहराला माहिती दिली जाईल, त्यामुळे यांच्यावर सामुहिक बहिष्कार टाकला जाईल, तसेच या आरोपींना मदत करणाऱ्यांवर दहशत राहील अशी योजना योगी सरकारने बनवली आहे.

काय आहे आदेशात –

  • महिलांवर कोणत्याही प्रकारे अत्याचार करणाऱ्या आरोपींना महिला पोलिसांनी दंड द्यावा
  • महिला पोलिसांनी अशा गुन्हेगारांना अद्दल घडवावी
  • तसेच या गुन्हेगारांना मदत करणाऱ्या लोकांचीही नावे जाहीर करावीत.
  • ज्याप्रकारे एन्टी रोमिया स्क्वॉडने छेड काढणाऱ्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर जरब बसवला तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याने हे अभियान राबवावे.
  • कुठेही महिलांवर अत्याचार होत असेल तर त्याची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर असेल.
  • यापूर्वीही योगी सरकारने असं पाऊल उचललं होतं.

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केले जात होते, उत्तर प्रदेशातही सीएएविरोधातील आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरु होते. यावेळी उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. सरकारी संपत्तीचं नुकसान झालं. त्यावेळी योगी सरकारने हिंसा करणाऱ्या आणि सरकारी संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांचे पोस्टर्स शहरातील अनेक रस्त्यांवर लावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER