मुख्यमंत्री आपलाच होणार : उद्धव ठाकरेंचा शिवसेना आमदारांना दिलासा

मुंबई : हॉटेल रिट्रीट हॉटेल येथे शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिलासा दिला. आपण घाबरू नका राष्ट्रपीत राजवट लागू झाली असली तरी मुख्यमंत्री आपलाच आहे. ठाकरे यांनी आपल्या आमदारांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री नको; काँग्रेसची अट

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मला दोन तीन फोन करायचे असल्याचे सांगून ते बाहेर केले. मात्र याबाबतचा विस्तृत तपशील समजू शकला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे आमदार या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समवेत आदित्य आणि तेजस ठाकरेसुद्धा उपस्थित होते.