मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल

CM Udhhav Thakre reach to meet PM Modi

नवी दिल्ली : मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेत असतात. हा शिष्टाचार समजला जातो. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही पंतप्रधानांपुढे मांडतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरु झाल्याची माहिती आहे.

या बैठकीला कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित आहेत. राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना हा 25 वर्ष भाजपाचा मित्रपक्ष होता आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा

  • 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिकृत भेट.
  • 7 वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट.
  • 8 वाजता भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची आशिर्वाद भेट.
  • 9 वाजता केंद्रीय गृह मंत्री यांची अमित शहा यांची भेट.