२८.५ लाख शेतकर्‍यांना मिळणार कजर्माफीचा लाभ, २२ फेब्रुवारीपासून सुरुवात

CM Uddhav Thackeray-Loan Weaiver

मुंबई :- महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत आतापर्यंत राज्यातील २८.५ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. ही माहिती राज्य शासनाच्या सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची १८ हजार कोटी रुपयांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे, हे येथे उल्लेखनीय.

जवानांच्या अपमानाचे प्रकरण : आदित्य ठाकरेंचे ट्विट

दोन महिन्यांपूर्वी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. आता नव्या स्वरूपात २२ फेब्रुवारीपासून ही योजना प्रारंभ होत आहे. काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, या योजनेसाठी १० हजार कोटी रुपये आकस्मिकता निधीमधून उपलब्ध करण्यासाठी मान्यता देण्यात आली, हे विशेष. या निधीची मर्यादा १५० कोटी रुपयांची होती. ५ मार्चपर्यंत संबंधित निर्णय घेणे आवश्यक असल्याने १० हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यातील २८.५ लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. एकूण ३४.५ लाख अर्जांची छाननी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.