‘सत्ता असो वा नसो हा माणूस भविष्यात महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा नेता असेल !’ सोशल मीडियावर व्हायरल

CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोना या विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार कोरोनापासून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत. ज्या शांततेने उद्धव ठाकरे हे जागतिक संकट हाताळत आहेत, देशभरातून त्यांचे कौतुक होत आहे.

ओमर अब्दुलांपासून बॉलिवूड सेलिब्रटी, दाक्षिणात्य कलाकार तर जनसामान्य माणूसही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक आणि स्तुती करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ओमर अब्दुल्लांनी ट्विट करून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. तर यासोबतच सामान्याहून सामान्य जनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ‘आमचा अधिक विश्वास आहे. तेच काय ते करतील.’ अशा शब्दांत त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. “आई म्हणते उद्धव ठाकरेंचं भाषण लाव, त्यांना ऐकून बरं वाटतं… तेच काय ते करतील… सगळं नीट होईल. ” या पोस्टला प्रतिसाद देत अनेकांनी या विधानाचं समर्थन केलं आहे. तर, ‘सत्ता असो वा नसो हा माणूस भविष्यात महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा नेता असेल! ’ डेली हंट मराठीने मंगळवार २४ मार्च रोजी दिलेलं वृत्त आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

डेली हंट मराठीचे हे वृत्त :
“राज्यात निर्माण झालेली परिस्थिती संयमाने हाताळणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची जनतेकडून जोरदार स्तुती होत असून अमेय तिरोडकर यांनी एक ट्विट करत म्हटलंय, मी उद्धव ठाकरे यांच्यावर असंख्य वेळा तिखट टीका केली. वेळ आली तर भविष्यात ही टीका करेन; पण गेल्या १५ दिवसांत ह्या माणसाने जी काही परिस्थिती हाताळली आहे, हे त्यांनी कोरोना संपेपर्यंत असंच चालू ठेवलं तर हा माणूस पुढचा राज्यातील सर्वोच्च नेता असेल; मग सत्ता असो अथवा नसो, असं त्यानी म्हटलं आहे. तर त्यांच्या ट्विटला सहमत म्हणून उत्तर देणाऱ्या राजन क्षीरसागर यांचा दाखला देत ते जर सहमत असतील तर माझं मत नक्कीच बरोबर असेल; कारण राजन क्षीरसागर हे आयुष्यभर कम्युनिस्ट विचारासाठी वाहून घेतलेले निष्ठावंत जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर अनेकांनीही ह्या ट्विटला आपली सहमती दर्शवली आहे.”