
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुंबईतील (Mumbai) कोरोना (Corona) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ्चानक कोरोनाने युटर्न घेतल्याने काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.
मुंबईतदेकील कोरोनाचा वेग वाढला आहे. लोकलसेवा वाढविण्यात आल्यानंतर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. राज्यात अमरावती, अकोला, पुणे याठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे, मुंबईतही लोकलबाबत आणि संचारबंदीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या ४ दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला ६ हजारांच्या वर पोहचली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी शिस्त पाळावी, मास्क वापरावा असं आवाहन केले आहे. पुढील ८ दिवस महत्त्वाचे आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगितलं होतं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला