
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने दैनिक सामनामध्ये (saamana) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सध्या फक्त हात धुतोय; जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. काहींना डोक्याचे विकार झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करावे लागतील. मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही. तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत.
तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो. सुडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) यांनी भाजपला थेट इशाराच दिला आहे. तसंच, ‘तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते.
ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सुडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची? ’ असे थेट आव्हानच मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला